गुणरत्न सदावर्तेंना मोठा धक्का, एसटी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरव पाटील यांची हकालपट्टी


 एसटी बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालकांना सहकार आयुक्तांनी जोरदार दणका दिलाय. एकही पात्रता निकष पूर्ण न करता आल्यामुळे पदावरुन हटववण्यात आले आहे.

 एसटी बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील हे गुणरत्न सदावर्ते यांचे जवळचे नातेवाईक आहेत. आरबीआयची पूर्व परवानगी न घेताच पदावर बसवल्यानंतर सहकार खात्याने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता थेट कारवाई करण्यात आली आहे.

 एसटी बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील यांच्याकडून पात्रता निकषाची पुर्तता होत नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. एसटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांना किमान आठ वर्षांचा अनुभव हवा असतो.

Post a Comment

0 Comments