सोलापूर | वारसाची नोंद करून देतो म्हणून ३ हजाराची मागितलेला लाच, खाजगी इसम अँटी करप्शन च्या ताब्यात



सोलापूर |

सोलापुरात नगर भूमापन कार्यालयात वारस नोंद करून देतो म्हणून तीन हजाराची लाच घेणाऱ्या खाजगी इसमाला अँटी करप्शन विभागाने रंगेहाथ पकडले. खाजगी इसम अ.रऊफ म. शरीफ शेख रा. ३९६, न्यु. पाच्छा पेठ, लाल बहादुर शास्त्री हायस्कुल जवळ, सोलापूर यातील प्राप्त तक्रारीनुसार तक्रारदार माझे वडील मयत झाल्याने त्यांचे नावावर असलेल्या जागेवर तक्रारदार व त्यांची आई, भाऊ, बहीन यांची वारस नोंद करण्यासाठी तक्रारदार यांनी नगर भूमापन कार्यालय, सोलापूर येथे अर्ज केला होता. 

सदर कार्यालयात वारस नोंद होण्याबाबत तक्रारदार पाठपुरावा करीत असताना सदर कार्यालयात एजंट म्हणून काम करणारा खाजगी इसम नामे अ.रऊफ म. शरीफ शेख यांनी तक्रारदार यांचेकडे सदर काम करुन देतो असे सांगून तक्रारदार यांचेकडे ३,००० रुपये लाचेची मागणी करुन सदरची लाच रक्कम इनामदार हॉटेल, सोलापूर समोर रोडवर दिनांक २९.१२.२०२३ रोजी स्वतः स्विकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. 

व त्यांचेवर सदर बझार पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही कारवाई गणेश कुंभार, पोलीस उपअधीक्षक, लाप्रवि, सोलापूर,पोह शिरीषकुमार सोनवणे, पोना श्रीराम घुगे, पोकों रवि हाटखिळे, चालक शाम सुरवसे सर्व ने. अॅन्टी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी केली.

Post a Comment

0 Comments