अभिनेत्री रिंकू राजगुरू अकलूज भूषण पुरस्कार जाहीर


महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीने राष्ट्रपती पुरस्कार विजेती अभिनेत्री रिंकू राजगुरू हिला 'अकलूज भूषण' पुरस्कार जाहीर झाला आहे. ३१ डिसेंबर रोजी पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते- पाटील यांनी दिली.
लोकनेते स्व. प्रतापसिंह मोहिते- पाटील यांच्या प्रेरणेने राम मंदिर परिसरात या वर्षीपासून 'अकलूज फेस्टिव्हल' हा उपक्रम सुरू केला आहे. अकलूज हे गाव सहकाराच्या बरोबरच संस्कृती आणि परंपरेचे माहेरघर आहे. 

सांस्कृतिक, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांतील व्यक्तींना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने अकलूज फेस्टिव्हलमध्ये या वर्षीपासून दरवर्षी महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीने 'अकलूज भषूण' हा पुरस्कार देण्यात येणार आहे. हा पुरस्कार कला, क्रीडा, आरोग्यसेवा, उद्योग, पत्रकारिता, लोकप्रशासन, विज्ञान आणि समाजसेवा आदी क्षेत्रात केलेल्या विशेष योगदानासाठी दिला जाणार आहे.

Post a Comment

0 Comments