बार्शी | नायब तहसीलदार काझी ,मंडल अधिकारी डोईफोडे,तलाठी गरड यांच्यासह चौघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल.बार्शी |

  महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ प्रमाणे वाटप करण्याचे आधिकर नसताना संगनमत करून वाटप करून सातबारा हक्कपत्रकी बेकायदेशीर नोंद घेलत्या प्रकरणी बार्शी येथील तत्कालीन नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग बार्शी न्या.जे.आर.पठाण यांनी दिले. 

या प्रकरणी रघुनाथ ढगे, नायब तहसिलदार मजीद काझी, मंडल अधिकारी उमेश डोईफोडे, तलाठी महेश गरड यांच्यावर भा. द. वि. कलम ४०९, ४२०, ४६३,४६४ ४६६, १२०(a), १६६, १६६(a), १६७, १९१, १९२, १९९, २००, २०८, २०९ व ३४ अन्वये बार्शी शहर पोलीस स्टेशन यांना सी.आर.पी.सी. कलम १५६(३) प्रमाणे चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

या बाबत अधिक माहिती अशी की लिंबराज ढगे यांच्या मालकीची शहर म्यु.पल हद्दीतील जमीन गट नं ६३८ आहे. सदर जागे बाबत बार्शी न्यायालयात वाटपाचा दावा प्रलंबित आहे. सदर वाटपाचा दावा प्रलंबित असताना लिंबराज ढगे यांनी कोणतीही संमती नसताना त्यांची बनावट सही, बनावट प्रतिज्ञापत्र करून तेच आहेत असे भासवण्यासाठी बनावट व्यक्ती उभा करून श्री ढगे यांच्या परवानगी शिवाय तसेच त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीच्या संमती शिवाय महारष्ट्र महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ प्रमाणे वाटप करून सातबारा हक्क पत्रकी बेकायदेशीर नोंदी घेतल्या आहेत. विशेष बाब म्हणजे महारष्ट्र महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ प्रमाणे नायब तहसीलदार, मंडल अधिकारी यांना वाटप करण्याचे अधिकार नसताना वाटप करून नोंदी घेतल्या आहेत. 

लिंबराज ढगे यांनी बेकायदेशीर नोंदी रद्द व्हावी, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी व तलाठी यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून महसुलच्या वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई न झाल्याने अँड नितीन शिंदे यांच्या मार्फत न्यायालयात फौजदारी अर्ज दाखल केला होता. सदर अर्जा सोबत दाखल केलेले पुरावे मा. न्यायालयाने ग्राह्य धरून वरील प्रमाणे बार्शी शहर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यात लिंबराज ढगे यांचे मार्फत अँड नितीन शिंदे यांनी काम पाहीले .

Post a Comment

0 Comments