मासिक पाळीच्या वेदनांवर घेतल्या गर्भनिरोधक गोळ्या; १६ वर्षीय मुलीचा रक्ताच्या गुठळ्यामुळे मृत्यूमुंबई |

मासिक पाळीमुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने १६ वर्षीय मुलीचा रक्ताच्या गुठळ्या झाल्याने मृत्यू झाल्याची घटना ब्रिटनमध्ये घडली आहे. लैला खान असे या तरुणीचे नाव आहे.

मासिक पाळीचा त्रास कमी करण्यासाठी गर्भनिरोधक गोळी घेण्याचा सल्ला तिला तिच्या मित्रांनी दिला होता. महाविद्यालयीन विद्यार्थिनी असलेल्या लैलाने २५ नोव्हेंबरपासून गोळ्या घेण्यास सुरुवात केली. मात्र, ५ डिसेंबरपासून तिला डोकेदुखीचा त्रास होऊ लागला आणि आठवड्याच्या अखेरीस तिला उलट्या होऊ लागल्या. दर ३० मिनिटांनी उलट्या होत असल्याने तिच्या कुटुंबीयांनी तीला रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी पोटात किडे असल्याचे सांगत तिला एक गोळी खायला देत थोडी वाट पाहण्यास सांगितले.

तिचा त्रास वाढत चालल्याने आणि पलंगावर वेदनेने तडफडत असल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल केले असता तिच्या मेंदूमध्ये रक्ताची गुठळी तयार होउन मेंदूला सूज आल्याचे दिसले. तिला रुग्णालयात आणत असताना ती बाथरूममध्ये पडली आणि बेशुद्ध झाली. मेंदूची गुठळी काढण्याच्या शस्त्रक्रियेसाठी तिला नेण्यात आले. मात्र, तेथे तिला ब्रेन डेड घोषित करण्यात आले.

Post a Comment

0 Comments