सोलापूर |
नवीन पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करावी, कंत्राटी व योजना कामगार प्रदीर्घकाळ सेवेत असल्यामुळे सर्वांना समान किमान वेतन देऊन सेवा नियमित करावी, सर्व रिक्त पदे तात्काळ भरावी, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती विनाश अर्थ कराव्या चतुर्थश्रेणी व वाहनचालक पदे भरण्यावरील बंदी हटवावी, यासह अठरा मागण्यासाठी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारून सरकारच्या विरोधात एल्गार पुकारला आहे.
सोलापुरात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व संघटनांनी एकत्रित येत निदर्शने आंदोलन केले.
या आंदोलनात शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष शंतनू गायकवाड, निमंत्रक अशोक इंदापुरे, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सोलापूर शाखा अध्यक्ष वीरूपक्ष घेरडे, सरचिटणीस अमृत कोकाटे, कार्यालयीन सचिव किशोर सावळे हे संपाचे नेतृत्व करीत आहेत.
महापालिका, जिल्हा परिषद, महसूल, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभाग, सहकार, आरोग्य विभाग, राज्य कर विभाग, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, धर्मादाय आयुक्त, भूमी अभिलेख, आरटीओ विभाग, वन विभाग, पशुसंवर्धन विभाग, उपनिबंध कार्यालय, समाज कल्याण विभाग, लेखा परीक्षण विभाग, राज्य कामगार विमा रुग्णालय, कृषी विभाग, नोंदणी विभाग, भूजल कार्यालय, पोलीस कर्मचारी संघटना, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, आयटीआय कार्यालय, आरटीओ कार्यालय या भागातील कर्मचारी संपात सहभागी आहेत.
0 Comments