बुडणाऱ्या मैत्रिणींना वाचवण्यासाठी बंधाऱ्यात उडी, तिघीही बुडाल्या, दोघींचा मृत्यूनाशिक |

दिवाळी म्हणजे चैतन्याचा सण, सध्या सर्वत्र उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील भालेराव आणि जाधव कुटुंबावर ऐन दिवाळीच्या तोंडावर दु:खाचा डोंगर कोसळला. दोन्ही कुटुंबातील अल्पवयीन युवतींचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. नांदगाव तालुक्यातील चिंचविहीर गावातील के. टी. बंधाऱ्यावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या या तरुणींवर काळाने घाला घातला. पूजा अशोक जाधव आणि खुशी देवा भालेराव या 16 वर्षीय तरुणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.  

मिळालेल्या माहितीनुसार, पूजा अशोक जाधव, खुशी देवा भालेराव आणि कावेरी भालेराव या तिन्ही मैत्रिणी नेहमी प्रमाणेच कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. चिंचविहीर गावाजवळ असलेल्या के. टी. बंधाऱ्यावर त्या कपडे धुवत होत्या. कपडे धुवत असताना अघटित घडले. पूजा जाधव आणि खुशी भालेराव या दोघींचा अचानक पाय घसरला आणि त्या पाण्यात बुडू लागल्या. त्या दोघी पाण्यात बुडत असल्याचं लक्षात येताच कावेरीनेही तात्काळ पाण्यात उडी घेऊन त्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, तिला त्या दोघींना वाचवण्यात अपयश आले. 

Post a Comment

0 Comments