परंडा | भांडगाव येथे विहिरीच्या पाण्याच्या बारीवरुन मारहाण व जीवे मारण्याची धमकीपरंडा |

विहिरीच्या पाण्याच्या बारीवरून परंडा तालुक्यातील भांडगाव येथे लाथा बुक्क्यांनी व काठीने मारहाण करून शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेची फिर्याद गोरख भगवान धस, वय ५२ वर्षे, रा. भांडगाव, ता. परंडा जि. धाराशिव यांनी परंडा पोलिसात दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याविषयी सविस्तर माहिती अशी की, आरोपी नामे- १ )बाळासाहेब भगवान धस, २) रुक्मिनी बाळासाहेब धस,३) भाउसाहेब बाळासाहेब धस, ४) धनाजी बाळासाहेब धस सर्व रा. भांडगाव ता. परंडा जि. धाराशिव यांनी ६ नोव्हेंबर रोजी माणकेश्वर ते भांडगाव जाणारे रस्त्यावर फिर्यादी नामे- गोरख भगवान धस, वय ५२वर्षे, रा. भांडगाव, ता. परंडा जि. धाराशिव यांना नमुद आरोपीनी विहीरीचे पाण्याचे बारीचे कारणावरुन फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे कलम ३१४,३२३,५०४,५०६,३४ भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments