धाराशिव |
मराठा योद्धा मनोज जरांगे – पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरे सुरु केले आहेत तर ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये यासाठी ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी अंबडमध्ये सभा घेऊन वातावरण तापवले आहे. त्यानंतर सोशल मीडियावर ऐकमेकांविरुद्ध पोस्ट लिहून वातावरण गढूळ केले जात आहे. त्यावर धाराशिव पोलीसांनी करडी नजर ठेवली आहे.
सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे इंटरनेट मुळे जवळपास घरोघरी स्मार्टफोनचा वापर होत असुन सोशल मिडीया घरोघरी पोहचला आहे. या सोशल मिडीयाचा वापर करताना भावनेच्या भरात किंवा प्रसंगी कुणाचा पानउतारा करण्याच्या उद्देशाने त्यावर भडक प्रतिक्रिया दिल्या जातात यातुन समाजात दुरावा निर्माण होतो. यातुनच वाद निर्माण होवून गुन्हे दाखल होतात.
सध्या मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षण या संदर्भात समाजात अंदोलने/ उपोषन होत आहेत. त्या अनुषंगाने सोशलमिडीयावर प्रोक्षभक विधाने, चर्चा, प्रतिक्रिया देवून वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी जनतेने या संदर्भात सोशलमिडीयाचा वापर करताना संयम बाळगावा प्रोक्षभक विधाने, प्रतिक्रिया टाळ्याव्यात व सामाजिक सलोखा राखावा असे आवाहन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जनतेस केले आहे.
0 Comments