पाचवीतील अनाथ विद्यार्थ्याची आश्रमशाळेत आत्महत्या


धुळे |

धुळ्यातील आंमळी ता. साक्री येथील अनुदानित आदिवासी आश्रम शाळेतील पाचवीच्या विद्यार्थ्याने शाळेच्या आवारात बाथरूम मध्ये गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 

त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अनिल कमाशा पाडवी रा. त्रिशूल असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो आंमळी ता. साक्री येथील अनुदानित आदिवासी आश्रम शाळेत इयत्ता पाचवीत शिकत होता.  शाळेच्या आवारात बाथरूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर मयत विद्यार्थ्याला आई व वडील नसल्याचे समजते.

Post a Comment

0 Comments