भांडण तंटे मिटवून गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे - आमदार राजेंद्र राऊतबार्शी |

बार्शी तालुक्यातील साकत येथे आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते १६ कोटी ७९ लाख ६० हजार रुपये मंजूर विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले तसेच साकत गावासाठी विविध योजनांच्या माध्यमातून विकास कामे मंजूर केल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने आमदार राजाभाऊ राऊत यांचा कृतज्ञता सोहळ्यातून नागरी सत्कार करण्यात आला.

साकत येथे आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते साकत ते पिंपरी निलकंठा नदीवरील पुलासाठी ६ कोटी ५० लाख,साकत ते घाणेगांव निलकंठा नदीवरील पुलासाठी २ कोटी ४८ लाख,साकत ते घाणेगांव भोगावती नदीवरील पुल २ कोटी ४५ लाख,साकत ते पानगांव रस्ता २ कोटी ४९ लाख,पारधी वस्तीसाठी ३० लाख,श्री क्षेत्र ज्योर्तिलिंग मंदिर २५ लाख,९५/०५ योजने तुन २० लाख, कळंबवाडी ते साकत ओढ्यावरील बंधाऱ्यासाठी १२ लाख, १५ व्या वित्त योजने तुन ११ लाख,२५/१५ योजने तुन सिमेंट काँक्रीट रस्ता १० लाख,साकत ते पिंपळगांव रस्त्यासाठी १० लाख,
घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन ९ लाख ६० हजार इत्यादी कामांचे उद्घाटन व आमदार निधीतून श्री भैरवनाथ मंदिर सभा मंडपासाठी १५ लाख,जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजने साठी १ कोटी १४ लाख,दलित वस्तीतील रोड व गटारीसाठी ११ लाख,निलकंठा नदीवरील बंधारा दुरुस्ती २० लाख आदी मंजूर कामांचे लोकार्पण करण्यात आले.

बार्शी तालुक्यातील विविध विकास कामे करण्यासाठी प्रयत्नशील असुन गावातील भांडण तंट्यामुळे गावचा विकास थांबत असून त्यामुळे गावांच्या विकासाला खीळ बसत आहे.गावातील सर्वांनी भांडण तंटे विसरून विकासासाठी एकत्र यावे,असे झाले तरच गावचा विकास होईल असे राजाभाऊंनी सांगितले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष(दादा)निंबाळकर,बार्शी नगरपालिकेचे माजी नगरसेवक विलास(आप्पा)रेणके,सोसायटी चेअरमन बाबासाहेब मोरे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती झुंबर जाधव,सागर मोरे तसेच गावातील इतर प्रमुख मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments