महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता सप्ताह संपन्न


बार्शी | 

श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी यांच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व  लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सोमवार २ ऑक्टोबर २०२३ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता सप्ताह राबविण्यात आला.

प्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री व कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवर हस्ते झाले.  या नंतर संस्थेचे अध्यक्ष डॉ.बी.वाय. यादव यांच्या हस्ते नारळ फोडून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

या कार्यक्रम प्रसंगी सर्व शाखा प्रमुखांना मान्यवरांच्या हस्ते कचराकुंडीचे वितरण करण्यात आले. संस्थेचे सचिव पी.टी.पाटील यांनी प्रास्ताविक व्यक्त करताना या थोर महापुरुषांच्या जयंती निमित्त प्रत्येक शाखेमध्ये आपण स्वच्छता मोहीम राबवली आहे.प्रत्येक शाखेमधील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे सुद्धा या स्वच्छता मोहिमेत उतरलेले आहेत.तसेच संस्थेतील सर्व शाखेमधून स्वच्छ शाखा असा पुरस्कार संस्थेने चालू केला आहे हा पुरस्कार ४ फेब्रुवारीला देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
या स्वच्छता मोहिमेची सुरुवात कॉलेज ऑफ नर्सिंग व श्री शिवाजी महाविद्यालय यांच्या प्रांगणापासून करण्यात आली तसेच सर्व शाखेने आप आपल्या शाखेचा परीसर स्वच्छ केला.

या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ.बी.वाय.यादव, संस्थेचे सचिव पी.टी. पाटील ,सहसचिव ए.पी.देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे,संस्थेचे ट्रस्टी सी.एस.मोरे,संस्थेचे कार्यकारिणी सदस्य दिलीप मोहिते, संस्थेचे सदस्य श्री सर्जेराव माने, श्री बापू शेळवणे, श्री पी.बी. लोखंडे,प्राचार्य डॉ.ए.बी.शेख, प्राचार्य डॉ.एस.के.पाटील,प्राचार्य डॉ सुग्रीव गोरे, प्राचार्य डॉ दिपक गुंड, प्राचार्या के.डी. धावणे,मुख्याध्यापक सौ.एन.एस. पाटील,प्रा.किरण गाढवे,सर्व शाखा प्रमुख,सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments