धाराशिव |
शहरातील एका तरुणाचा दारू पाजून निर्घृण खून करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन आरोपीविरुद्ध शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरेापी नामे-1) राजेंद्र माणीक राठोड, रा. दिपक नगर तांडा ता. तुळजापूर जि. धाराशिव, 2) तात्या उर्फ गजनी ऊर्फ राजेश बालाजी कांबळे, रा. पापणास नगर तुळजापूर नाका धाराशिव यांनी दि. 16.09.2023 रोजी 10.00 ते 19.00 वा. सु. पापनाश नगर कोकाटे यांचे पाण्याचे तळ्याजवळ धाराशिव येथे मयत नामे- परमेश्वर मनोहर पाटोळे, वय 35 वर्षे, रा. पापनाश नगर, तुळजापूर नाका धाराशिव ता. जि. धाराशिव यांना दारु पाजून त्यास कोकाटेचे पाण्याचे तळ्यावर पोहण्यासाठी नेले व तेथे परमेश्वर पाटोळे यांना दगडाने डोक्यात मारुन जिवे ठार मारले व त्याचे प्रेताची कोठेतरी विल्हेवाट लावून पुरावा नष्ट केला.
याप्रकरणी फिर्यादी मैना मनोहर पाटोळे, वय 48 वर्षे, रा. पापनास नगर तुळजापूर नाका धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.11 .10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 302, 201, 34 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
0 Comments