भूम | खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप, ६ महिने सश्रम कारावास


भूम |

दिनांक २९ फेब्रुवारी २०२० रोजी १२.०० ते १२.३० वाचे सुमारास मौजे पाटसांगवी, ता भुम येथे यातील आरोपी नामे बाबा उस्मान पटेल वय ३४ वर्षे, रा पाटसांगवी याने इसम नामे दस्तगीर जिलानी पटेल यास हात उसने दिलेले पैसे परत घेण्याचे कारणावरून त्याचेजवळील लायन्सनधारी रिव्हॉलव्हरने गोळी झाडुन जिवे ठार मारून शस्त्र अधिनियमाचे उल्लंघन केले वगैरे मजकुराचे फिर्यादीवरून भूम पोलीस ठाणे येथे भादवि कलम ३०२ सह शस्त्र अधिनियम कलम ३० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ नेमणुक भुम पोस्टे यांनी करून मा न्यायालयात आरोपीविरूध्द दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर गुन्हयात उगले अतिरीक्त सत्र न्यायाधिश, अति सत्र न्यायालय भुम यांनी सदर आरोपीस दोषी धरून खुनासाठी जन्मठेप व १०,०००/- रूपये दंड तसेच शस्त्र अधिनियम उल्लंघनासाठी ६ महिने सश्रम कारावास व २०००/- रूपये दंडाची शिक्षा दि. १३/१०/२०२३ रोजी सुनावली आहे. सदर केसमध्ये शासकीय अभियोक्ता म्हणुन  गाडे  यांनी कामकाज पाहिले आहे.

 पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ यांनी व प्रल्हाद सुर्यवंशी, पोनि भुम पोस्टे यांनी वेळोवेळी सदर केसचा पाठपुरावा करून कोर्ट पैरवी अधिकारी सपोउपनि / बी. एम. बळे नेमणुक येरमाळा  याना सूचना देऊन आढावा  घेत होते .त्यामुळे सदर आरोपीस मा न्यायालयाने पुराव्याचे आधारे शिक्षा सुनावली.

Post a Comment

0 Comments