बार्शी | चंदन चोरी करणारी टोळी जेरबंद 16 लाख 12 हजाराचा माल जप्त ; तालुका पोलिसाची कामगिरी


बार्शी ते परंडा रोडवर एक आयशर टेम्पो वीटकरी
रंगाचा येणार असून त्यामध्ये चंदनाचे कट्टे भरलेले आहेत अशी गोपनीय बातमीदारा मार्फत मिळालीलागलीच डी. बी. पथक व पोलीस स्टेशनकडील स्टाफसह बार्शी ते परंडा रोडवर रवाना केले. तेथे बातमीप्रमाणे बातमी प्रमाणे पथक गस्त करीत असताना संशयीत टेम्पो हा हॉटेल जगदंबा, उपळाई ठोंगे शिवार येथे परंडा रोडने येथे येत असताना दिसून आला.

 त्यास थांबविले असता टेम्पो मोकळा दिसून आला. परंतू काळजीपूर्वक पहाणी केली असता पाठीमागील
हौद्यात पत्र्याचा कप्पा बनवुन त्यात काहीतरी लपवल्याचे दिसून आले. ते पाहिले असता चंदनाचे 13 कट्टे
प्लास्टिक (गोण्या) भरलेले आढळून आले. सदर बाबत खात्री केली असता सदरचे चंदन एकूण 424.800 किलो
वजनाचे बाजारभाव किं. 10,60,000/- रु. अंदाजे व आयशर टेम्पो 5,50,000/- रु. असा एकूण 16,12,000/- चा माल हस्तगत करण्यात आला आहे. सदर कारवाईमध्ये आरोपी 1) विवेक धनाजी थोरात 2 ) महेश हनुमंत गुंड यांना अटक केली असून सदर आरोपी हे पोलीस कोठडीत असून मा. न्यायालयाने त्यांना दिनांक 10/10/2023 रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी जालींदर नालकूल यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांचे नेतृत्वाखाली पो. उप नि. बालाजी वळसने, पोहेकॉ राजेंद्र मंगरुळे, पोहेकॉ अभय उंदरे, पोहेकॉ धनराज केकाण, पोकॉ वैभव भांगे, पोकॉ बोंदर चालक पोकॉ शिवशंकर खराडे व पोकॉ रतन जाधव (सायबर पो.स्टे.) यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments