बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने धाराशिव नामकरणाचा आनंदोत्सव...! बोला रे बोला... धाराशिव बोला..



धाराशिव |

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने उस्मानाबादचे धाराशिव करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शनिवारी (दि.16) आनंदोत्सव साजरा करण्यात आला. बोला रे बोला.. धाराशिव बोला.., छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणा देत फटाके फोडून लाडू वाटून मोठा जल्लोष केला.

यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके म्हणाले की, उस्मानाबाद शहराला आधीचे धाराशिव हेच नाव द्यावे या मागणीसाठी आमच्या आधीच्या पिढीने मोठा संघर्ष केला. मोठी आंदोलने करून सरकारचे लक्ष या मागणीकडे कायम वेधले. त्या संघर्षाला आज खर्‍या अर्थाने यश आले आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षात हे नामकरण होत असल्याचा आनंद आहे. याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे त्यांनी आभारही व्यक्त केले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, शिवसेना मागासवर्गीय जिल्हाप्रमुख अमित बनसोडे, शिवसेना शहर संघटक रंजीत चौधरी, युवासेना शहरप्रमुख सागर कदम उपतालुकाप्रमुख प्रशांत पाटील,  शिवसेना उपशहर प्रमुख रजनीकांत माळाळे, नितीन चव्हाण, अमर माळी , प्रवीण पवार, काका खोत, भारत शिंदे , उद्धव अवचार,  दत्ता चव्हाण, ज्ञानेश्वर ठवरे, शुभम पांढरे, गणेश जाधव, राजेश माळाळे , सौरभ निंबाळकर यांच्यासह बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments