मुंबई
केंद्र सरकारनं संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. 18 सप्टेंबरपासून संसदेच्या पाच दिवसीय विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. पहिल्या दिवशी संसदीय कामकाज सध्याच्या वास्तूत होणार आहे.
दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 सप्टेंबरपासून नव्या संसदेतून कामकाजाला सुरुवात होणार आहे. 19 सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे आणि हाच मुहूर्त पाहून संसदेच्या नव्या वास्तूत कामकाजाचा श्रीगणेशा होणार आहे. एएनआय वृत्तसंस्थेने या संदर्भात माहिती दिली आहे.
0 Comments