मराठा आरक्षणासाठी धाराशिवात ३० वर्षीय तरुणाची तलावात उडी घेऊन आत्महत्या



धाराशिव |

जालना जिल्ह्यातील चराटी अंतरवली येथे मराठा बांधव आंदोलन करत असताना पोलिसांनी त्यांच्यावर अमानुष लाठीचार्ज केला. त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रावर आंदोलने होत आहेत. मराठा आरक्षणासाठी सर्व स्तरातून आक्रमकपणे भूमिका घेताना युवक वर्ग दिसून येत आहे. अशातच एक दुर्दैवी प्रकार समोर आला आहे.


धाराशिवमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी एका ३० वर्षीय तरुणाने तलावात उडी घेत आत्महत्या केली आहे. किसन चंद्रकांत माने असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे.

किरण हा उमरगा तालुक्यातील माडज येथील रहिवाशी होता. मराठा समाजाला आरक्षण मिळाणं गरजेचं आहे, असं म्हणत त्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments