उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली तलवार भेट



मुंबई :

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांची खासदार उदयनराजे भोसले यांनी सदिच्छा भेट घेतली. उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले या भेटी दरम्यान त्यांना तलवार भेट दिली.

 सातारा जिल्हयामध्ये ब्रिटिशकालीन पुलांची संख्या अधिक आहे त्यांचे वयोमान 100 पेक्ष्या अधिक वर्षांचे आहे. या पुलांवरून वाहतूक करणे व यांचा वापर करणे धोकादायक झाले आहे यासंदर्भात नवीन पर्यायी पूल उभारणी करण्याची यावेळी मागणी केली. तसेच सातारा जिल्ह्यामध्ये पर्यटनवाढीसाठी खूप मोठा वाव आहे निसर्गाने सातारा जिल्ह्यावर मुक्तहस्त उधळण केली आहे पर्यटन वाढीच्या माध्यमातून स्थानिकांना व गरजूंना मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते. पर्यटन विकासाच्या माध्यमातून जिल्ह्याचा व स्थानिक लोकांचा मोठ्या प्रमाणावर विकास होऊ शकतो.

कृषी क्षेत्रातील विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली संभाव्य दुष्काळजन्य परिस्थिती पाहता व धरणांतील पाण्याचा साठा लक्षात घेता योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी पुरवणे गरजेचे झाले आहे यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.

आरोग्य विभागाशी निगडित विविध निर्णय शासनाने जाहीर केले आहेत यामध्ये राज्यातील सर्व लोकांना जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या माध्यमातून मोफत उपचाराची सोय सर्वत्र चालू झाली आहे या निर्णयाचा सर्व गरजू रुग्णांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या वाढवणे गरजेचे आहे तसेच जिल्ह्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रावर अपुरे मनुष्यबळ आहे त्याठिकाणी काहीवेळा रुग्णांची गैरसोय होत असते याबाबत ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.

सातारा जिल्ह्यात जलसंपदा विभागाचे अनेक सिंचन प्रकल्प मोठ्या गतीने पूर्णत्वास जात आहेत अशावेळी या प्रकल्पांना निधीची कमतरता येऊ नये व सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण झाले पाहिजेत यासाठी भरीव निधीची मागणी यावेळी केली. खासदार उदयनराजे भोसले यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केले आहे.

Post a Comment

0 Comments