RPI ला सोबत घेतल्याशिवाय महायुतीला राज्यात सत्ता आणणं अशक्य - रामदास आठवले


मुंबई |

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला रिपब्लिकन पक्षाला सोबत घेतल्याशिवाय राज्यात सत्ता आणणे अशक्य असल्याचे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 

आगामी निवडणुकांमध्ये आरपीआयचे पाच ते सहा आमदार निवडून येतील, अशी आमची बांधणी सुरू आहे. सर्व घटक पक्षांशी एकत्र बसून आम्ही चर्चा करणार आहे. राज्यात माझा गट प्रभावी असल्याने महायुतीने आरपीआयला डावलून चालणार नाही. 

२००९ मध्ये माझा शिर्डी लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला होता. त्यानंतर शिर्डी मतदारसंघातील अनेक नेते मंडळी भाजपमध्ये आल्याने मी पुन्हा शिर्डीमधून इच्छुक आहे.’’ असं विधान रामदास आठवले यांनी केलं आहे.

Post a Comment

0 Comments