सोलापूर – गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक मध्ये शिकणाऱ्या एका १७ वर्षीय किशोरवयीन तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शिवगंगा नगर भाग ५, कुमठा नाका) येथे गुरुवारी सकाळच्या पडली. सुमारास यशराज निरंजन निबाळकर (वय १७ रा. शिवगंगा नगर भाग ५) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
राहत्या परातील बेडरूम मध्ये छताच्या पंख्याला नायलॉन दोरीने गळफास घेतला होता. त्याला फासातून सोडवून काकांनी खाली उतरवून बेशुद्ध अवस्थेत उपचाराकरिता सोलापूर शहरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरनी उपचारापूर्वीच यशराज यास मृत घोषित केले आहे.मयत यशवंत निंबाळकर हा पॉलिटेक्निकमध्ये कॉम्प्युटरचे शिक्षण घेत होता.ड्रेस बदलण्यासाठी तो बेडरूम मध्ये गेला तो परतला नाही. त्यावेळी खिडकीतून पाहिले असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.
त्याला फासातून सोडवून शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तो उपचारापूर्वी मयत झाला. मयत यशराज निंबाळकर यांच्या पश्चात आई-वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे. त्याचे वडील निरंजन हे बांधकाम मिस्त्री म्हणून काम करतात या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस झाली आहे.
0 Comments