सोलापूर |
सलगर वस्ती पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक दत्तात्रय रामचंद्र कांबळे नेम.सलगरवस्ती पोलीस ठाणे यांनी १५ हजार रुपयांची लाचेची केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
यातील तक्रारदार यांचे मौजे कवठेगांव येथे घराचे बांधकाम सुरु असुन बांधकामासाठी लागणारी वाळु ही तक्रारदार यांनी त्यांच्या भावाच्या घरासमोर रस्त्याच्या कडेला टाकली होती. दि.०७/०७/२०२३ रोजी यातील आरोपी लोकसेवक कांबळे यांनी तक्रारदार यांच्या भावास सदरची वाळु चोरीची आहे, तुमच्या विरूध्द गुन्हा दाखल करतो असे म्हणून तक्रारदार यांच्या भावास पोलीस स्टेशनला घेऊन गेले. त्यानंतर सदरचे प्रकरण मिटवण्यासाठी २० हजार रुपये लाचेची मागणी करीत असलेबाबत तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली होती.
प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने दि. ०७/०७/२०२३ रोजी पंचासमक्ष तक्रारीची पडताळणी केली असता यातील आरोपी लोकसेवक दत्तात्रय कांबळे यांनी तक्रारदार व त्यांच्या भावाविरुध्द वाळु चोरीची कारवाई न करण्यासाठी व तहसीलदार यांना वाळु चोरीबद्दल अहवाल न पाठवता, त्याबदल्यात सार्वजनिक रस्त्यावर अडथळा निर्माण केल्याचा २८३ प्रमाणे भाग-६ ची कारवाई करून प्रकरण मिटवून टाकतो असे सांगुन १५ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे.भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ प्रमाणे सलगरवस्ती पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
0 Comments