पतीचे निधन झाल्यानंतर महिलेचे अल्पवयीन तरुणासोबत जबरदस्तीने शरीरसंबंधपुणे |

 शहरातून पुन्हा एकदा एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनात पतीचे निधन झाल्यानंतर २८ वर्षीय महिलेने शेजारी राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन तरूणासोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हे प्रकरण पुणे शहरातील कोंढवा पोलिस स्टेशनच्या  हद्दीत झाले आहे. तरी या प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

कोरोनामध्ये या महिलेच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर ह्या २८ वर्षीय महिलेने शेजारी राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन तरूणासोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवल्याची तक्रार १७ वर्षीय अल्पवयीन तरूणाने कोंढवा पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. दरम्यान या २८ वर्षीय महिलेच्या मोबाईलमध्ये दोघांच्या शरीर संबंधाचे व्हिडिओ क्लिप सापडल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे.

पतीचे निधन झाल्यानंतर ही महिला एकटीच राहत होती. तर जबरदस्ती केल्याची खोटी तक्रार पोलिसात करेन, अशी धमकी या महिलेने अल्पवयीन तरुणाला दिली. धमकी देत महिलेने अल्पवयीन तरुणासोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. तसेच या महिलेने या संपूर्ण कृत्याचा व्हिडिओ क्लिप तिच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यास तरूणाला भाग पाडले. दरम्यान हा संपूर्ण प्रकार अल्पवयीन मुलाच्या कुटूंबीयांना कळताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यांनी कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये हा संपूर्ण प्रकार सांगत त्या महिलेविरुद्ध कोंढवा पोलिसमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments