बार्शी उपसा सिंचन योजनेसाठी ३१५ कोटी..


बार्शी |

तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वकांक्षी असलेली बार्शी उपसा सिंचन योजनेच्या उर्वरित कामासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून ३१५ कोटी पैकी २८२ कोटी रुपये मंजूर कामास कार्यारंभ आदेश प्राप्त झाला असुन‌ उर्वरित ३३ कोटी रुपये मंजूर कामास लवकरच कार्यारंभ आदेश प्राप्त होणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.

    बार्शी उपसा सिंचन योजना ही मागील ३० वर्षांपासून रखडलेली आहे. ही योजना पूर्ण व्हावी व तालुक्यात हरित क्रांती घडावी यासाठी आमदार राजेंद्र राऊत शासन दरबारी सतत प्रयत्न करत होते,त्यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे बार्शी तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

  उर्वरीत टप्प्यात बार्शी तालुक्यातील अरणगाव,धोत्रे, कुसळंब,खामगाव,तावडी,तांदुळवाडी,शेलगाव,बावी,सौंदरे, पिंपळगाव,कळंबवाडी,साकत,दडशिंगे,पानगाव,रस्तापुर, उंडेगाव,इर्ले,सुर्डी,गुळपोळी,मालवंडी,यावली तसेच माढा तालुक्यातील वाणेवाडी आदी गावातील शेती ओलिताखाली येणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी,मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आमदार राजेंद्र राऊत यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments