माजी नगराध्यक्ष बारबोले यांना मागितले ५ लाख ; न दिल्यास घरासमोर उपोषणाला बसण्याची धमकीबार्शी |

५३ एकर जमीन बळकावली असा आरोप करत पाच लाखाची मागितले तुम्ही पैसे न दिल्यास तुमच्या घरासमोर उपोषणाला बसतो, अशी धमकी दिल्याची फिर्याद माजी नगराध्यक्ष विश्वासराव अर्जुन बारबोले (वय ५७) कासारवाडी रोड बार्शी यांनी यांनी शहर पोलिसात दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने ५३ एकर जमीन बळकावली आहे असा आरोप करून या जमिनीचे प्रकरण मिटवून घेण्यासाठी तुम्ही मला पाच लाख रुपये द्या, अन्यथा तुमच्या घरासमोर उपोषणाला बसतो बसून तुमची बदनामी करतो अशी धमकी १३ ऑगस्ट रोजी माजी नगराध्यक्ष विश्वासराव बारबोले यांना दिली. बारबोले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शैलेश शरणाप्पा मनसाखरे (वय ४०) सोलापूर रोड, बार्शी या इसमाविरोधात बार्शी शहर पोलिसात भादवी कलम ३८५, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस नाईक जाधव हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments