भगवंत सेना दल ठरतेय अपघात ग्रस्तांसाठी वरदान !


बार्शी |

 भगवंत सेना दलाच्या माध्यमातून आतापर्यंत विविध अपघातामध्ये रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेल्या, सात व्यक्तींचा जीव वाचवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे. बार्शी शहर आणि परिसरामध्ये विविध भागांमध्ये विविध अपघातामध्ये गंभीररीत्या जखमी झालेल्या व्यक्तींना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांच्यावरती योग्य ते उपचार करून, अपघातग्रस्तांचे जीव वाचवण्याचे मोठे कार्य भगवंत सेना दलाच्या माध्यमातून केले जात आहे.

 काल परवाच कुर्डूवाडी लातूर बायपास रोडवर असणाऱ्या पोद्दार इंग्लिश स्कूलच्या समोर झालेल्या अपघातामध्ये खंडू शेंडगे आणि सचिन चोपडे दोघे रहाणार बार्शी हे गंभीररित्या जखमी झाले होते. भगवंत सेना दलाचे स्वप्निल पवार आणि अक्षय बारंगुळे यांनी घटनेची माहिती मिळताच, क्षणाचाही विलंब न करता लागलीच घटनास्थळी पोहोचून जखमींना डॉक्टर जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान जखमींच्या नातेवाईकांना संपर्क करून सदरील घटनेची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. 

जखमींचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर भगवंत सेनादलाच्या सदस्यांनी, सदरील घटनेचा वृत्तांत सांगून नातेवाईकांना दिलासा दिला. भगवंत सेना दलाच्या या कार्यामुळे बार्शी शहर आणि तालुक्यामध्ये होत असलेल्या अपघातामधील अपघातग्रस्तांना खऱ्या अर्थाने जीवनदान देण्याचे कार्य भगवंत सेना दलाच्या माध्यमातून होत असल्याची चर्चा बार्शी तालुक्यामध्ये होत आहे.

Post a Comment

0 Comments