“मोदी सरकारच्या कामगिरीमुळे शरद पवारांचेही मतपरिवर्तन होईल”, चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा


मुंबई |

गेल्‍या नऊ वर्षांच्‍या भाजपा सरकारच्‍या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वातील कामगिरी पाहता राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांचेही लवकरच मतपरिवर्तन होईल आणि ते खासदार सुप्रिया सुळे यांच्‍यासह मोदींच्‍या नेतृत्‍वाला मदत करतील, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला.

बावनमुळे म्‍हणाले, एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्‍वाचा विचार घेऊन भाजपाला पाठिंबा दिला आहे. अजित पवार यांनीदेखील नरेद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाचे समर्थन करून २१ व्‍या शतकातील समर्थ भारत निर्माण करण्‍याची क्षमता केवळ मोदींमध्‍येच आहे, असे स्‍पष्‍ट केले आहे.अनेक राजकीय पक्षातील नेते मोदींच्‍या नेतृत्‍वावर विश्‍वास प्रकट करीत आहेत. त्‍यामुळे शरद पवार यांचेही मतपरिवर्तन होणार आहे.

Post a Comment

0 Comments