शेतकरी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रमुखपदी महेश गलांडे


बार्शी |

 २५ ऑगस्ट शेतकरी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रमुखपदी पुणे जिल्ह्यातील, दौंड येथील महेश भाऊसाहेब गलांडे-पाटील यांची नियुक्ती शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी शासकीय विश्रामगृह बार्शी येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये सर्वानुमते केली.

 गलांडे यांनी यापूर्वी रयत क्रांती संघटना व विविध पक्षांमध्ये काम केलेले असून लवकरच शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली शेकडो शाखांचे उद्घाटन करणार असल्याचे यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना महेश गलांडे यांनी सांगितले. यावेळी बाळासाहेब यादव, सचिन आगलावे, संतोष वारगड, गणेश वारगड, राहुल गलांडे, मंगल निंबाळकर, प्रताप निकम, पुष्पक पिंपरे, शरद भोसले आदींनी त्यांना निवड झाल्याबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. 


Post a Comment

0 Comments