पोलीस उपनिरीक्षकाचा निर्घृण खून; सांगोला तालुक्यातील घटना

सांगोला – अज्ञात मारेकरांकडून पाठीमागून धारदार शस्त्राने वार करून पोलीस उपनिरीक्षकाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, ही घटना आज बुधवारी सकाळी ६ च्या सुमारास वासुद (ता. सांगोला) येथील केदारवाडी रोडवर उघडकीस आली.

पोलीस उपनिरीक्षक सूरज विष्णू चंदनशिवे (वय ४२) हे वासूद (ता.सांगोला) जेवणानंतर रात्री घरापासून केदारवाडी रोडवर शतपावली करण्यासाठी गेले असता बुधवारी रात्री ११ च्या दरम्यान अगोदरच दबा धरून बसलेल्या अज्ञात मारेकऱ्यांनी पाठीमागून डोक्यात वार करून खून केला. रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत म्हणून नातेवाईकांनी आज सकाळी शोध घेतला असता वासूद- केदारवाडी रोडनजीक त्यांचा मृतदेह आढळून आला.

Post a Comment

0 Comments