भारताचं चांद्रयान-३ चे यशस्वी लँडिंगमध्ये बार्शीचा झेंडा


बार्शी |

भारताचे चंद्रयान थ्री लँडिंग यशस्वी करण्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील घाणेगाव येथील शास्त्रज्ञाचाही सहभागआहे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील घाणेगावची कन्या व शास्त्रज्ञ  वैष्णवी प्रभाकर पाटील असे त्या शास्त्रज्ञाचे नाव आहे. चंद्रायान ३ यशस्वीपणे लँडिंग झाल्यामुळे भारताचा जगभरात डंका वाजला आहे.

मूळची घाणेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील असणाऱ्या या शास्त्रज्ञाने सोलापूर जिल्ह्याचे नाव पूर्ण भारतभर केले आहे, त्यांच्या या यशात बाकीचे शास्त्रज्ञांचाही मोठा वाटा आहे. अभिनंदन त्या सर्व शास्त्रज्ञाचे ज्यांनी अनेक वर्षे या क्षणासाठी कष्ट घेतले.

Post a Comment

0 Comments