इंस्टाग्रामवर पाकिस्तान जिंदाबादची पोस्ट ; मेडिकलच्या विद्यार्थ्याला अटक


बुलढाणा |

स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना समाज कंटक विचित्र कृती करताना दिसत आहेत. बलढाणा येथे एका तरुणाने proud to be a pakistani अशी पोस्ट सोशल मिडिावर टाकली. या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. 

अटक केलेल्या तरुणाने इंस्टाग्राम वर पाकिस्तानच्या स्वतंत्र दिनाचा उल्लेख करत पाकिस्तानी झेंडे आणि पाकिस्तानी असल्याचा गर्व आहे अशी पोस्ट टाकली होती. या तरुणाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हा तरुण मलकापूर येथील औषधनिर्माण महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. मलकापूर येथील औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयातील मुजम्मिल खान अहमद खान या विद्यार्थ्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर " proud to be a pakistani आणि पाकिस्तानी झेंडे घेऊन पाकिस्तान स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

Post a Comment

0 Comments