शाळकरी मुलीचा माझी बायको म्हणत फोटो व्हायरल ; मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न


पुणे |

तरुणाच्या त्रासामुळे शाळकरी मुलीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या धक्कादायक घटना ओैध भागात घडली. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका तरुणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार शाळकरी मुलीचा आरोपी कांबळे गेल्या काही महिन्यांपासून पाठलाग करत होता. त्याने शाळकरी मुलीची छायाचित्रे समाजमाध्यमात प्रसारित केली. छायाचित्रावर 'माझी बायको' असा संदेश प्रसारित केला होता. आरोपीच्या त्रासामुळे शाळकरी मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कुटुंबीयांनी तिला धीर दिला. तेव्हा आरोपीच्या त्रासामुळे आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे तिने सांगितले. त्यानंतर तिच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक रिकिबे तपास करत आहेत

Post a Comment

0 Comments