बार्शी | ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते व विविध विकास कामांसाठी ५ कोटी निधी मंजूर..


बार्शी |

बार्शी तालुक्याचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास व पंचायत राज विभागाचा मुलभूत सुविधा पुरविणे २५/१५ योजनेअंतर्गत बार्शी तालुक्यातील ४२ गावातील गावांतर्गत रस्ते व विविध विकास कामांसाठी ५ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.

  बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील निधी मंजूर करण्यात आलेली गावे पुढीलप्रमाणे:-भोयरे येथील आगळगाव रस्ता ते विकास वाणी वस्ती रस्ता करणे(१०), घारी येथील बार्शी-लातूर रस्ता ते ज्ञानेश्वर जगदाळे वस्ती व बाबासाहेब काकडे शेतापर्यंत रस्ता करणे(२०),कळंबवाडी येथील गाव अंतर्गत रस्ता करणे(१०),उपळाई ठोंगे येथील रगडे वस्ती ते वारदवाडी रस्त्यापर्यंत रस्ता करणे(१०),पांगरी येथील अंकुश निंबाळकर ते बालाजी जगदाळे घर रस्ता करणे(१०),पांगरी मारुती मंदिर ते अचानक चौक रस्ता करणे,कळंबवाडी (पा) जाधव वस्ती येथील पोपट चव्हाण घर ते मच्छीद्र जाधव घर रस्ता करणे(१०),जहानपुर गाव अंतर्गत रस्ता करणे(१०),रुई खंडोबा मंदिर परिसर सुधारणा करणे(१०),उपळे दु. जुना वैराग रस्ता ते गोवर्धन पवार शेतापर्यंत रस्ता करणे(१०),नारी गाव अंतर्गत रस्ता करणे(१०),हळदुगे गाव अंतर्गत रस्ता करणे(१०),तडवळे नरसिंह मंदिर परिसर सुशोभीकरण करणे(१०),श्रीपत पिंपरी गाव अंतर्गत रस्ता करणे(१०), मालवंडी गाव अंतर्गत रस्ता करणे(१०),पानगाव गाव अंतर्गत रस्ता करणे(१०), कव्हे गाव अंतर्गत रस्ता करणे(१०),बावी आ गाव अंतर्गत रस्ता करणे(१०),साकत पिंपरी गाव अंतर्गत रस्ता करणे(१०),भालगाव गाव अंतर्गत पेव्हर ब्लॉक बसवणे(१०),शेळगाव आर गाव अंतर्गत रस्ता करणे(२०), उंबरगे गाव अंतर्गत रस्ता करणे,चुंब गाव अंतर्गत रस्ता करणे(१०),बेलगाव गाव अंतर्गत रस्ता करणे(२०), मांडेगाव गाव अंतर्गत रस्ता करणे(२०),भांडे गाव गाव अंतर्गत रस्ता करणे(१०),रऊळगाव गाव अंतर्गत रस्ता करणे(१०), मालेगाव गाव अंतर्गत रस्ता करणे(१०),रस्तापूर गाव अंतर्गत रस्ता करणे(१०),हत्तीज निलकंठेश्वर मंदिर ते सापते वस्ती रस्ता करणे(१०),तांदुळवाडी गाव अंतर्गत रस्ता करणे(१०), पाथरी गाव अंतर्गत रस्ता करणे(१०),नांदणी नांदणी ते लिंबाजी यादव ते पोपट यादव यांच्या शेतापर्यंत रस्ता करणे(२०), नागोबाचीवाडी गाव अंतर्गत रस्ता करणे(१०), कांदलगाव गाव अंतर्गत रस्ता करणे(२०),देवगाव गाव अंतर्गत रस्ता करणे(२०), धसपिंपळगाव गाव अंतर्गत रस्ता करणे(१०),पुरी गाव अंतर्गत रस्ता करणे(१०),कुसळंब गाव अंतर्गत रस्ता करणे(२०), कासारी आंबुरे वस्ती ते भुसारे वस्ती रस्ता करणे(१०), वाघाचीवाडी गाव अंतर्गत रस्ता करणे(१०),कदमवस्ती गाव अंतर्गत रस्ता करणे(१०). 

 बार्शी तालुक्यासाठी विविध योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीबद्दल आमदार राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री गिरीषजी महाजन यांचे आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments