मुंबई |
सद्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर ‘शिवसेना’ पक्ष व आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह यावरून दोन ठाकरे व शिंदे गटात वाद सुरू होता. मात्र निवडणूक आयोगाने मूळ शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची असल्याचा निर्वाळा दिला आहे. यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित असून मूळ शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह कुणाचं याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णयही प्रलंबित आहे. असं असताना शिंदे गटातील आमदार भाजपाच्या कमळ चिन्हावर लढणार का अशा चर्चांना उधाण आलं आहे. कारण आहे , शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी केलेले एक वक्तव्य ..
आमदार किशोर पाटील नेमकं काय म्हणाले ?
आमदार किशोर पाटील यांनी म्हटले की, तांत्रिक अडचण आली तर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक चिन्हावर म्हणजेच कमळ चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरू. याबाबतीतला निर्णय एकनाथ शिंदे घेतील. ते सांगतील त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेऊ,असं किशोर पाटील म्हणाले
‘धनुष्यबाण’ आणि ‘शिवसेना’ आमचीच आहे, यावर निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे ९९.९ टक्के भाजपाच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढण्याची आमच्यावर वेळ येणार नाही. पण जर तांत्रिक अडचण निर्माण झाली, तर कदाचित तसा निर्णय घेतला जाऊ शकतो.
0 Comments