Crime | मयताच्या अंत्ययात्रेपूर्वीच मारेकऱ्यास पोलीसांनी पकडलेसोलापूर |

 रांजणी (ता. पंढरपूर) येथील फॉरेस्टमधील खुनाचा अवघ्या १२ तासात उलगडा झाला. मयताच्या अंत्ययात्रेपूर्वीच सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मारेकऱ्यास पकडले. नितीन माळी (रा. अनवली, ता. पंढरपूर) असे पोलिसांनी अटक केलेल्या मारेकऱ्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रांजणी गावाच्या शिवारात अभिमान मारूती मेटकरी (वय ५५) यास डोकीत धारदार हत्याने मारूण गंभीर जखमी करून जिवे ठार मारले होते. याबाबतचा गुन्हा पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. खुनाची घटना घडताच स्थानिक गुन्हे शाखेची टीम मारेकऱ्याच्या शोध घेण्यासाठी तपास
सुरू केला. 

घटनास्थळावर आढळून आलेल्या वस्तू व गोपनीय माहितीच्या
आधारे मयताचे मारेकरी यांचा शोध घेत असताना पोलिस उपनिरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकास नितीन माळी याने गुन्हा केल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्याचा तपास केला. उसने पैसे दिले होते, ते पैसे परत करण्याच्या कारणावरून शिवीगाळ केल्याच्या कारणावरून रांजणी गावाच्या शिवारातील फॉरेस्टमध्ये घेवून जावून जिवे ठार मारल्याची कबुली दिली. त्यावरून त्यास अटक करण्यात आली आहे. 

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक हिंम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील, पोलिस उपनिरीक्षक शैलेश खेडकर, सहाय्यक फौजदार खाजा मुजावर, निलकंठ जाधवर, बिराजी पारेकर, पोह नारायण गोलेकर, धनाजी गाडे, प्रकाश कारटकर, मोहन मनसावाले, पोकॉ धनरान गायकवाड, अक्षय दळवी, अक्षय डोंगरे, समीर शेख यांनी पार पाडली.

Post a Comment

0 Comments