जिवंत आईला मृत दाखवून मुलाने केला जमीन हडपण्याचा प्रकार; भोईजे येथील घटना


बार्शी |

जिवंत आई असताना तिला मृत दाखवून मुलाने जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. यासंदर्भात बार्शी पोलिसांनी सौदागर विष्णु डांगरे (रा. भोईंजे, ता. बार्शी) याच्याविरोधात मंगळवारी दुपारी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी संबंधित तपास अधिकारी दिलीप ढेरे यांना दिले आहेत. 

याबाबत बार्शी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुमनबाई विष्णु डांगरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी या जिवंत असताना त्या मयत असल्याचे भासवून मुलगा सौदागर याने तशी बनावट कागदपत्रे तयार केली.

शिवाय कोर्टापासून खरी वस्तूस्थिती लपवून ठेवून फिर्यादीच्या नावे असलेली जमीन फिर्यादीच्या परस्पर सौदागर याने स्वत:च्या नावावर करण्याच्या हेतून फिर्यादीची कोणत्याही प्रकारची संमती नसताना सौदागर याने आर्थिक लाभाकरिता बेकायदेशीर मृत्यू नोंद होण्याबाबतचे आदेश घेऊन फिर्यादीची व कोर्टाची फसवणूक केल्याप्रकरणी सौदागर याच्यावर बार्शी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments