बार्शीच्या तरुणाचा हैदराबादमध्ये दुर्दैवी मृत्यू


बार्शी |

तालुक्यातील शिराळे गावचे सुपुत्र शरद सोनवणे यांचे अपघाती निधन झाले. हैदराबाद येथील एका पेंटच्या कंपनीमध्ये काम करत असताना झालेल्या स्फोटात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

शरद हे गेल्या 4 ते 5 वर्षांपासून हैदराबाद येथील पेंटच्या कंपनीत कामाला होते. 4 दिवसांपूर्वी कंपनीत आग लागली असताना, ती विझवण्यासाठी ते गेले होते. मात्र, दरम्यान स्फोट घेऊन 3 जणांचा मृत्यू झाला. तर, शरद गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, रविवारी सकाळी त्यांचे निधन झाले.

शरद यांचं वर्षभरापूर्वीच लग्न झालं होतं. त्यांच्या निधनाने कुटुंबियांसह गावातही शोककळा पसरली आहे. 
आज शिराळे गावात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, आई आणि एक बहीण आहे.

Post a Comment

0 Comments