धाराशिव | क्रिकेट खेळणाऱ्या बारा वर्षीय मुलाचा अज्ञात शिफ्ट कारच्या धडकेत मृत्यू


धाराशिव |

सांजा रोड उस्मानाबाद येथे क्रिकेटच्या मैदानात खेळत असताना बॉल आणण्यासाठी गेलेल्या एका बारा वर्षीय मुलाचा अज्ञात शिफ्ट डिजायर कारच्या धडकेत मृत्यू झाला आहे. मयत नामे- सोहम संतोष कांबळे, वय 12 वर्षे, रा. रामनगर, सांजा रोड बायपास उस्मानाबाद हे दि. 13.07.2023 रोजी 17.30 वा. सु विठ्ठल रुक्मिणी मंदीरासमोर मैदानात क्रिकेट खेळत असताना बॉल तुळजापूर ते औरंगाबाद जाणाऱ्या रोडवर गेल्याने तो आणण्यासाठी गेला असता अज्ञात स्विप्ट डिजायर कार चालकाने त्याचे ताब्यातील कार ही हायगई व निष्काळजी पणे भरधाव वेगात चालवून सोहम कांबळे यांना धडक दिली.

या आपघातात मयत नामे सोहम कांबळे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. नमुद वाहनाचा अज्ञात चालक आपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचा वडील- संतोष भागवत कांबळे यांनी दि. 18.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम 279, 338, 304 (अ) सह मो. वा. का. कलम 184अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments