हात पकडून मोबाईल नंबर मागितल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल



सोलापूर |

अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिचा मोबाईल नंबर मागितल्याप्रकरणी तरुणावर पोक्सो अंतर्गत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिषेक कोळी ( रा. सोलापूर ) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पीडित मुलगी ही अल्पवयीन असून ती संगणकाच्या क्लासला गेली होती. ती जिन्यातून जात असताना आरोपी हा तिच्या जवळ आला. तिचा हात पकडून तुझा फोन नंबर मला दे, तू कोणत्या कॉलेजला ॲडमिशन केले आहे, ते मला सांग असे बोलून लज्जास्पद वर्तन केले. शिवाय तू जर कोणाला सांगितली तर तुझ्या घरच्यांना बघून घेईन अशी धमकी दिली, अशा आशयाची फिर्याद पीडितेने दिली आहे. या फिर्यादीवरून आरोपीवर भादवि ३५४,३५४ ड,५०६ सह पॉक्सो कलम १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक कुकडे पोलिस हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments