मानेगाव जवळ दोचाकी व चारचाकी वाहनाची समोरासमोर धडक ; एकाचा मृत्यू



वैराग |

 बार्शी - सोलापूर महामार्गावरील मानेगाव जवळ एका चार चाकी वाहनाने दुचाकीस्वारास समोरासमोर धडक दिल्यामुळे दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून ही घटना सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली आहे. यामध्ये जागीच मयत झालेल्या इसमाचे नाव गोरख चांगदेव देशमुख ( वय ५२ )असे असून याप्रकरणी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बार्शी सोलापूर महामार्गावरील अपघातांची मालिका काही केल्यास थांबत नसल्याचे चित्र आहे रस्ता दर्जेदार आणि चांगला झाल्यामुळे वाहनांवरती नियंत्रण वाहन चालकाचे राहत नसल्याचे दिसून येत आहे दरम्यान सोमवारी सकाळी सोलापूरहून बार्शीकडे चाललेल्या एम एच १३ डी वाय ७८०० या चार चाकी गाडीने एम एच १३ डीके ५६९६  या दुचाकीस उडवल्याने दुचाकीस्वार गोरख चांगदेव देशमुख हे जागेवरच ठार झाले रविवारी सुट्टी असल्याने गोरख आपल्या गावी काळेगावकडे आले होते सोमवारी तांबेवाडी येथील ज्ञानदीप माध्यमिक आश्रम शाळेमध्ये सेवेसाठी रुजू होत असताना हा अपघात घडला शाळेवर जात असताना सोबत घेतलेले पीठ मीठ चपाती अपघातानंतर रस्त्यावर विखरून पडले होते.

अपघात इतका भयावह होता की चार चाकी गाडी अपघातानंतर रस्त्याच्या कडेला पलटी होऊन पडली घटनेनंतर प्रत्यक्षदर्शींनी धावत जाऊन गाडीच्या काचा फोडत चालकास बाहेर काढले दरम्यान मयत गोरख चांगदेव देशमुख यांचे शवविच्छेदन वैराग प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले असून चालक संगमेश्वर बंडाप्पा काडादी ( रा. सोलापूर ) याचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments