बार्शीमध्ये भगवंत सेना दलाची स्थापना : युवक युवतींचा मोठा सहभाग!

बार्शी 

जन हिताय! जन रक्षणाय! हे ब्रीदवाक्य घेऊन बार्शीतील युवकांनी, आपत्कालीन परिस्थितीमध्ये शहर आणि तालुक्यातील जनतेच्या रक्षणासाठी व हितासाठी समाजकार्य करण्याचा विढा उचलत भगवंत सेना दलाची स्थपना केली आहे.

याप्रसंगी सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत, निस्वार्थी निधर्मी, निःपक्षपाती भावनेने समाजाचे हित बघून समाजाच्या रक्षणासाठी समाजकार्य करण्याची शपथ घेतली.

आपल्या परिसरामध्ये ओढवलेल्या संकटाचा सामना करून, कुठल्याही प्रकारचा विलंब न लावता, तात्काळ सेवा देण्याचं व मदतकार्य करण्याचं कार्य या सेना दलाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारच्या संकटावर मात करत जनतेचे रक्षण करण्यासाठीच या सेना दलाची स्थपना करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

यामध्ये प्रामुख्याने पूरग्रस्त परिस्थिती, अचानक लागलेली आग, वनवा, भीषण अपघात, भूकंप, वसाहतींची पडझड, जंगली प्राण्यांचा हल्ला, सर्पदंश, नैसर्गिक आपत्ती, प्राथमिक उपचार, आत्महत्या, महिलांच्या अडचणी, विद्यार्थ्यांच्या अडचणी, सार्वजनिक उत्सव, विविध महोत्सव, यात्रा,  इत्यादी ठिकाणी मदत करण्याचा हेतू ठेवून भगवंत सेना दलाची स्थापना करण्यात येत असल्याचे भगवंत सेना दल प्रमुख धिरज शेळके यांनी सांगितले. यासाठी लागणरी सर्व साहित्य सामग्री तयार ठेवणार असून, या दलामध्ये शासकीय यंत्रणा मदतीसाठी सोबत असल्याचेही विविध शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

याप्रसंगी शहरातील व तालुक्यातील विविध भागातील युवक, युवती व महिलांनी मोठा प्रतिसाद देत सदस्य नोंदणीला सुरुवात करण्यात आली. बार्शी शहर आणि तालुक्यातील इच्छुक सदस्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन भगवंत सेना दल प्रमुख धिरज शेळके यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments