वाढदिवसानिमित्त सचित्र बालमित्र पुस्तके भेट


[ अँड.रणजीत महादेव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप ]
परंडा प्रतिनिधी - 

नुकत्याच सुरू झालेल्या शाळा आणि २९जून अँड.रणजीत महादेव पाटील यांच्या वाढदिवस व गुरू पौर्णिमानिम्मित जि प प्रा शाळा कपिलापुरी येथे अँड रणजीत महादेव पाटील यांनी ५० विद्यार्थ्यांना सचित्र बालमित्र उजळणी पुस्तके व शालेय साहित्य  वाटप करण्यात आले.
अनेक शालेय विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाही ही मोठी शोकांतिका आहे. नुसतच विद्यार्थी एक - एक इयत्ता पुढे सरकत राहतो मात्र गणिती आकडेमोड,मराठी शुद्ध वाचता येत नाही.अशा विद्यार्थ्यांसाठी सचित्र बालमित्र पुस्तके व शालेय साहित्य खरेदी करून दिल्यास हे विद्यार्थी वाचन कला तर शिकतीलच पण त्यांच्या पुढील चार पिढ्यांना शिकण्यास मदत होईल म्हणून  युवकमित्र परिवार पुणे यांच्या सहकार्याने प.पु.रामानंद सरस्वती महाराज सार्वजनिक वाचनालय कपिलापुरी,श्रीमंतराजे प्रतिष्ठाण, कपिलापुरी,शंभूसेना धाराशिव जिल्हा यांच्या वतीने हा सचित्र बालमित्र उजळणी पुस्तक भेट उपक्रम राबविण्यात आला.
 शाळा सुरू झाल्या असून  इयत्ता १ ली त प्रवेश घेणाऱ्या गोरगरीब वंचित विद्यार्थ्यांना आपण अगदी खाऊच्या पैशातसुद्धा ही पुस्तके व शालेय साहित्य खरेदी करून मोफत भेट देऊ शकतो तसेच 
शाळेत प्रथमच दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत अक्षर व अंक ओळख करून देणारे हे पुस्तक असून, चित्राच्या सहाय्याने आकलन क्षमता बळकट होण्यास मदत करते.  विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षांत सचित्र बालमित्र उजळणी पुस्तक मोफत मिळणार असल्याने विद्यार्थ्यांना शिकण्यास फायदा होणार आहे,
शाळेत अभ्यासक्रमासोबत सांस्कृतिक कार्यक्रम,खेळ,इतर कार्यक्रम घेतल्याने विद्यार्थ्यांनमध्ये शाळेबद्दल गोडी निर्माण होईल व विद्यार्थी शाळेत १००% उपस्थिती दर्शवतील या हेतूने 
 शाळेत सचित्र बालमित्र पुस्तक भेट हा उपक्रम राबविण्यात आला असे श्रीमंतराजे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अँड रणजीत महादेव पाटील यांनी सांगितले.या प्रसंगी जि प प्रा शाळेचे मुख्याध्यापक गरड व सहशिक्षक कुलकर्णी,प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अँड.रणजीत महादेव पाटील,विलास भोसले व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments