परंडा येथे बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त १४७ जणांचे रक्तदानपरंडा |

परंडा तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने माजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त परंडा येथे दि . १८ जुलै मंगळवार रोजी भव्य असे  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची पुजा करुन रक्तदान शिबिराचे उदघाटन माजी स्वातंत्र्य सैनिक मेजर लक्ष्मण बारसकर व पत्रकार आप्पासाहेब शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन प्रहार संघटनेचे परंडा तालुका अध्यक्ष नागनाथ नरुटे पाटील , शहर अध्यक्ष भरत ननवरे , प्रहार सेवक कानीफनाथ सरफणे , लक्ष्मण कवठे , हंबीराव मुळे , महेश खराडे ,सोमनाथ गायकवाड, बापू जगताप , अबा चौधरी , राजेन्द्र नरूटे , आण्णासाहेब गुडे , पै . लहु डाकवाले , शहाजी डाकवाले , सतिश सल्ले , संतोष सल्ले , गुलाब सल्ले, विशाल गुटाळ ,  यांनी केले होते . यावेळी जिल्ह्याचे प्रहार अंपग संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तथा राज्य कार्यकारणी सदस्य मयुर काकडे , प्रहारचे जिल्हा संघटक बाळासाहेब कसबे सर , प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील , तेर शाखा प्रमुख संजय नाईकवाडी , संदिप घोडके यांनी शिबिरास भेट दिली. 

ठाकुर कॉम्पलॅक्स येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात १४७ रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्त संकलित करण्यासाठी सह्याद्रि ब्लड बँक , धाराशिव डॉक्टर अलेकश कोरेगावकर , महेश तोडकरी , हर्षदा धोंगडे , प्रियंका क्षिरसागर , गुलाब शेख , ज्ञानेश्वर तोडकरी , शुभम सोनवणे यांच्या टिमने सहकार्य केले . तर शिबिर यशयस्वी करण्यासाठी नागनाथ पाटील , भरत ननवरे , कानीफ सरफणे यांनी परिश्रम घेतले

Post a Comment

0 Comments