मुंबई |
राष्ट्रवादीने सरकारसोबत निर्णय घेतला आहे . वरिष्ठ पातळीवर चर्चा होत होती. सर्वांचा विचार करत विकासाला महत्त्वं दिले पाहिजे. मागील नऊ वर्षात कारभार चालला आहे तसा चांगला प्रयत्न मोदी करत आहे. त्या भूमिकेला आपण पाठिंबा दिला पाहिजे म्हणून विकासाचा एकमेव मुद्दा समोर ठेवून आम्ही निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
अजित पवार म्हणाले, देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे, मी वर्धापन दिनी स्पष्ट भूमिका मांडली होती. तरुणांना संधी देणं गरजेचं आहे. नवीन कार्यकर्ते पुढे आणले गेले पाहिजे, तसा प्रयत्न माझा राहणार आहे. कोरोना होता तरी विकास ही आमची भूमिका होती. केंद्रीय निधी राज्याला कसा मिळेल यासंदर्भात पुढाकार घेणार आहे. हा निर्णय आमदारांना हा निर्णय मान्य आहे. आम्ही सत्तेत राष्ट्रवादी पक्ष म्हणून सहभागी होत असून पुढे देखील निवडणुका पक्ष चिन्हासोबतच लढवणार आहे.
0 Comments