सहाय्यक पोलीस निरीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात ; गुन्हा न दाखल करण्यासाठी मागितली पाच लाखाची लाच



सोलापूर |

पिकअप गाडी सोडवून गुन्हा दाखल न करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागून पहिला हप्ता तीन लाख रुपये मागितल्याप्रकरणी विजापूर नाका पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार संजय मोरे यांना विभागाच्या लाचलुचपत अधिकाऱ्यांनी अटक केली.

 समोरील व्यक्तीने दिलेली तक्रार दाखल करून न घेण्यासाठी तक्रारदाराकडे तब्बल ५ लाखांच्या लाचेची मागणी केली. त्यातील पहिला हप्ता घेण्यास संमती दर्शविल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहायक पोलिस निरीक्षक संजय मनोहर मोरे (वय ५७) याला जेरबंद केले. त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. विजापूर नाका पोलिस ठाण्यात कार्यरत संजय मोरे याच्याविरूद्ध तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाद मागितली होती.

त्याअनुषंगाने बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक, चंद्रकांत कोळी, पोलिस हवालदार शिरीषकुमार सोनवणे, पोलिस नाईक अतुल घाडगे, स्वामीराव जाधव, सलिम मुल्ला, वाहन चालक पोलिस शिपाई राहुल गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments