मुंबई |
भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी मोठा धक्का दिला आहे. बांगलादेशविरुद्धच्या तिसर्या एकदिवसीय सामन्यादरम्यान गैरवर्तनासाठी आयसीसीने तिच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. आयसीसीने हरमनवर दोन सामन्यांची बंदी घातली आहे. मागील आठवड्यात बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात तिला पंचांनी पायचित बाद केले. पंचांच्या निर्णयाने नाराज झालेल्या हरमनने स्टम्पवर आपला राग काढला. त्यानंतर सामना संपवल्यावरही तिने पंच, सामना अधिकाऱ्यांवर टीका केली होती.
आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी हरमनप्रीत कौरला पुढील दोन आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निलंबित करण्यात आले आहे, असे आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे. या निलंबनामुळे हरमनप्रीत सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. नाहिदा अख्तरच्या चेंडूवर हरमनप्रीतल पायचित बाद करण्यात आले. पण तो चेंडू तिच्या बॅटला लागला असल्याचा दावा तिने केला. पॅव्हेलियनमध्ये परतण्यापूर्वी त्याने आपला राग यष्टींवर काढला.
त्यानंतर हरमनने बक्षीस वितरण समारंभात पंचांवर टीका केली. या मालिकेचे संयुक्त विजेते असलेल्या संघांसोबत पंचांनी ट्रॉफी स्वीकारण्यासाठी यावं, असेही हरमनने म्हटले होते.
0 Comments