भूममध्ये 2 लाख 20 हजाराचा दारू साठा जप्त; दोघा जणांवर गुन्हा दाखल



भूम |

एक पिकअप वाहन एमएच 43 ए.डी. 9946 यामध्ये अवैधरित्या विदेशी दारुचा साठा असलेले पीकअप हे परंडा ते नगर रोडने जात असल्याची माहिती मिळाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदरचे पीकअप वाहन हे भुम शहरातील नगर रोड येथे थांबवून सदर वाहनांची तपासणी केली . 

सदर वाहनामध्ये नितीन भागवत ठोंबरे वय 27 वर्षे रा. बाणेगाव, ता. केज जि. बीड, विजय बाबुराव ठोंबरे वय 32 वर्षे रा. वाघे बाभूळगाव, ता. केज. जि. बीड हे मिळून आले. त्यांना सदर वाहनामध्ये काय आहे  असे विचारले असता त्यांनी काही एक माहिती दिली नाही पथकाने पीकअप वाहनामध्ये तपासणी केली असता त्यामध्ये 1) विदेशी दारु रॉयल स्टॅग कंपनीच्या 180 मिलीच्या 10 कार्टुन बॉक्स 2) इम्पेरियल ब्लु कपंनीचे 180 मिलीच्या 40 कार्टुन बॉक्स 3) मॅकडॉल नंबर वन कंपनीच्या 180 मिलीच्या 10 कार्टुन बॉक्स किं.अं. 2,20,800 ₹ तसेच पीकअप वाहन क्श्रमांक एमएच 43 ए.डी. 9946 किं. अं. 3,00,000₹ असे एकुण 5,20,800₹ किंमतीचे विदेशी दारु मिळून आल्याने त्यांचेवर महाराष्ट्र दारुबंदी कायदयाअंतर्गत कारवाई करीत आहोत.

सदरची  कामगिरी अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक, उस्मानाबाद, अपर पोलीस अधीक्षक  नवनीत कॉवत यांचे  मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे भुम हद्दीत अवैध धंदयाची माहिती काढून कारवाई करणे कामी दि. 08.07.2023 रोजी पोलीस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी, सहा. पोलीस निरीक्षक, शशीकांत तवार, सपोफौ ओव्हाळ, पोलीस हावलदार  राकेश पवार, बाबासाहेब जाधवर, पोलीस नाईक  अजित कवडे, पोलीस अंमलदार विठ्ठल मलंगनेर यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments