सिरसावची लेक बनली संत चरित्र मालिकेतील पारितोषिकाची मानकरीसिरसाव | 

प्रचार्य बाळासाहेब नवले यांची पत्नी, भोर, पुणे  मूळच्या बार्शी तालुक्यातील रस्तापूरच्या सून व सिरसावची लेक असलेल्या सुनिता नवले संत चरित्र मालिकेतील पारितोषिकाच्या मानकरी ठरल्यामुळे त्यांच सर्वत्र कौतुक होत आहे.

यांनी केलेल्या आध्यात्मिक कार्याबद्दल  त्या बोलताना म्हणाल्या की, आसारामजी बापू प्रचलित बालसंस्कार, नवरात्री बालिका पूजन, गणेश उत्सवामध्ये मुलांकडून अध्यात्मिक  पात्र रंगवणे, विनामूल्य विद्यार्थिनी शिबिर, अन्नदान तसेच पंढरपूरच्या वारीमध्ये तुळशी घेऊन वारी करत तुळशी महात्म्य व विठ्ठल नाम महात्म्य, गल्लीबोळातून वयोवृद्ध महिला कडून योगसाधना, ओंकार गुंजन प्राणायाम ,योगासने महिला दिनानिमित्त एकपात्री नाटक "मला काहीतरी सांगायचे आहे'  यातून महिलांचे योगदान अशाप्रकारच्या कार्या बद्दल त्यांना हे पारितोषक प्रदान करण्यात आले आहे तसेच आता नव्याने संत चरित्र हे नुकतेच सुरू होणाऱ्या मालिकेमध्ये ही त्यांचा सहभाग असणार आहे. तसेच आ राहुल ढीकने हे आपले मत मांडताना म्हणाले.

 समर्पण स्व आधार: महाराष्ट्रात संत चरित्र अखंडपणे सुरू राहण्यासाठी वारकरी संप्रदयाचा प्रचार प्रसार वाढावा यासाठी श्री भक्ती धारा परिवार कसोशीने प्रयत्न करीत आहेत त्यांचे कार्य खरोखरच वाखाण्याजोगे आहे. लहान पणापासून प्रवचन कीर्तन श्रवण करतांना आम्ही मोठे झालो आहे. वारकरी संप्रदयात कीर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून संस्काराचे बीज पेरले जात आहे. सर्वांनी हिंदुत्वाचे आचरण केले पाहिजे असे प्रतिपादन आमदार राहुल ढिकले यांनी केले.

नाशिक येथील ताराराणी सभागृहात श्री भक्तीधारा परिवार व भक्तीधारा अध्यात्मिक यूट्यूब चैनलच्या वतीने अध्यात्मिक, सामाजिक, पत्रकार, लेखक आदींचा सन्मान सोहळा नुकताच पार पडला. याप्रसंगी आमदार ढिकले श्री भक्ती धारा परिवाराचे कौतुक करताना बोलत होते. याप्रसंगी संत चरित्र या अध्यात्मिक मालिकेचे संहिता पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक श्रीमंत सीताराम बागल लातूरकर यांनी करून श्री भक्ती धारा परिवाराच्या कार्याची माहिती दिली.व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून भास्कराव पवार, बाळासाहेब चव्हाण, विजय माला राजू चौहान, मंगलाताई भंडारी, हभप कावेरी ताई पगार, अँड बाळासाहेब आडके, हभप बाळकृष्ण समर्पण स्व आधार: आदी मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

0 Comments