येरमाळा | सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या ; पतीसह सासरे व दिरावर गुन्हा दाखल



येरमाळा |

सासरच्या छळाला  कंटाळून नवविवाहित महिलेने आपल्या राहत्या घरी  गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना  गौर, ता. कळंब येथे घडली. सरीता प्रदिप ताकपिरे ( वय २५ वर्षे ) असे या नवविवाहित महिलेचे नाव आहे. 

सरीता हिचे पती-  प्रदिप ताकपिरे,  सासरे-कुमार ताकपिरे,  दिर-प्रविण ताकपिरे  यांनी घरगुती कारणावरुन सरीतास  शारिरीक व मानसिक त्रास दिल्याने त्यांच्या वेळोवेळी होत असलेल्या जाचास व त्रासास कंटाळून सरीताने   दि. २३जून रोजी १८.३० वा. सु. गौर येथे राहते घरी गळफास घेवून आत्महत्या केली. 


या आत्महत्या प्रकरणी मयत सरिताचे  वडील- बाबु सदाशिव ओव्हाळ रा. कात्रज आंबेगाव, ता. हवेली  यांनी दि. २४ जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पोलीस स्टेशनमध्ये भा.दं.सं. कलम- ३०६,४९८,(अ), ३२३,५०४,३४ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments