४,६४४ पदाची तलाठी भरती जाहीर ; अखेर मुहूर्त सापडलामुंबई |

गेली काही महिने प्रलंबित असलेल्या महसूल विभागातील तलाठी भरतीला अखेर मुहूर्त सापडला आहे. ४ हजार ६४४ तलाठी पदांच्या भरतीसाठी महसूल विभागाने जाहिरात काढली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार असून त्याची मुदत २६ जून ते १७ जुलै २०२३ आहे.

या भरतीसाठीची परीक्षा राज्यातील ३६ जिल्ह्याच्या केंद्रावर ऑनलाईन घेण्यात येणार आहे. ऑनलाईन परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना १००० रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. संगणकावर होणारी ही परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रात आयोजित केली जाईल. प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जातील.

Post a Comment

0 Comments